लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.
४ टिप्पण्या:
आजवर न भेटल्या फ़ुलाने
जगणे अवघे गंधित व्हावे.
मस्तच.
अलंकारीक शब्दयोजनेमुळे मजा द्विगुणित झाली.
आभार मुटेजी!
"शब्दांनी ओठांवर यावे" या कवितेतील ओळीनुसार,
कवीचे शब्द त्याच्याच ओठातून ऐकल्यावर ते अंतराला भिडतात याचा प्रत्यय आला.
---------------------
मध्येच थोडासा डिस्टर्बन्स का येत होता ते मात्र कळलं नाही.
धन्यवाद उल्हासजी! डिस्टर्बन्स माझ्या पीसीवर येत नाहिए.तरीही चेक करतो!
टिप्पणी पोस्ट करा